पवई विभागातील पेरू बाग येथे दिनांक 17 मे 2021 रोजी आलेल्या ताऊकते चक्रीवादळाने थैमान मांडुन तेथील जन जीवन विस्कळीत केले कित्येक लोकांच्या घरावर मोठे झाड पडून त्यांच्या संपूर्ण घराची राख झाली अश्या वेळी पी एस फाऊंडेशनचे अध्यक्ष मा.श्री.प्रदीप शर्मा ह्यांच्या मार्गदर्शनाने व अध्यक्षा श्रीमती स्वीकृती शर्मा व त्यांच्या सहकारी श्रीमती कल्पना अग्रवाल ह्यांच्या नेतृत्वा ने तेथील पाहणी करुन लोकांच्या समस्या जाणून त्यांना रेशन व धनादेश {Cheque } देऊन आर्थिक रित्या मदत केली व त्यांच्या समस्यांचे समाधान करण्यासाठी पी.एस.फाऊंडेशन परिवार सदैव त्यांचा सोबत आहे असे आश्वासन हि दिले.





