कोरोणा योद्धा सेवा सम्मान कार्यक्रम आज साऱ्या विश्वामध्ये कोरोणा सारख्या महामारी संकटाचा सर्वजण सामना करत आहोत. हे करत असताना समाजातील विविध घटक यामध्ये आपले योगदान देत आहे. काहीजण हॉस्पिटलच्या अंतर्गत आपली सेवा देत आहे तर काही रस्त्यावर उभे राहून लोकांच्या मदतीला जात आहे. असाच एक आपल्या समाजातला घटक आहे, तो म्हणजे आरोग्यसेविका, ज्या आरोग्यसेविका विभागात जाऊन प्रत्येक घराशी संपर्क साधून कोरोणा संकटामध्ये लोकांना धीर देण्याचं , त्यांना जागृत करण्याचं काम करीत आहे. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हातात घेतलेला वसा अगदी प्रामाणिकपणे करत आहे . ह्याच कामाची दखल घेऊन , त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी, आज दिनांक 16 ऑक्टोबर 2020 रोजी , अंधेरीमधील फिल्टर पाडा विभागात मा. *श्री प्रदीप शर्मा साहेब* यांच्या हस्ते *कोरोणा योद्धा सेवा सन्मानपत्र* देऊन त्यांना गौरवण्यात आलं. या कार्यक्रमांमध्ये मिलिंद विद्यालयाचे मुख्याध्यापक. श्री रावराणे साहेब तसेच महिला स्वावलंबन समितीच्या प्रमुख सौ. स्वीकृती शर्मा मॅडम त्यांच्या सहकारी कल्पना अग्रवाल जी तसेच एकता गुप्ताजी आणि समन्वयक हे उपस्थित होते..

