पी.एस फाउंडेशन या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मा. श्री प्रदीप शर्मा साहेब यांच्या निर्देशानुसार व महिला स्वावलंबन समितीच्या अध्यक्षा सौ. स्वीकृती शर्मा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली, कॅनरा बँक उपक्रम, महिला अधिम विकास केंद्र या अंतर्गत, पी.एस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांना आर्थिक दृष्ट्या रोजगार द्वारे सक्षम करण्यासाठी, पणत्या आणि पॉट पेंटिंग याचे मोफत प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षण अंतर्गत अंधेरी विभागांमधील महिलांना दीपावली निमित्त रोजगाराची संधी घरोघरी देण्याचे पी.एस फाउंडेशन वतीने महिलांची भरारी घेण्याची सुरुवात झाली आहे.

