श्रीमती. वैदेही अंकोलेकर (बस कंडक्टर) वैदेहीचे पती बस कंडक्टर होते पण लग्नानंतर काही वर्षांमध्येच त्यांचे निधन झाले. पतीच्या निधनानंतर वैदीही आपल्या कुटुंबासाठी पदर खोचून उभ्या राहिल्या. आपल्या मुलांना क्रिकेटर म्हणून घडवण्याचे आपल्या पतीचे स्वप्न साकार करणे हेच त्यांनी ध्येय मानले. आपल्या दिवंगत पतीच्या कामाच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी वैदेही यांनी योग्य ती परीक्षा दिली व बस कंडक्टर म्हणून सेवेत रुजू झाल्या. आज त्यांचा मुलगा अथर्व अंकोलेकर हा भारताच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघातून खेळत आहे.

